तुळजापूर / प्रतिनिधी-
कोरोना कालावधील संपूर्ण वीज बील माफ करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देवुन करण्यात आली.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की,  कोरोनाच्या संकटामुळे पूर्ण अर्थचक्र थांबले आहे.लोंकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे लोकांना अर्थिक चणचण भासतृ असल्याने ,शेती आणि घरगुतीचे संपुर्ण वीज बिल माफ करावे अशा मागणी चे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले. वीजबिलमाफी नाही केल्यास  तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, विधानसभा अध्यक्ष मयुर गाढवे, मल्लीकार्जुन कुंभार , धनाजी साठे , रोहित दळवी , प्रशांत डोलारे  , राहुल गायकवाड , अविनाश पवार , अकाश पवार , शिवाजी झाडपिडे , रूषी माने ,  युवराज पूरी आदी मनसैनिक उपस्थीत होते. 
 
Top