कळंब : (शिवप्रसाद बियाणी ) 
उज्वल यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर कनिष्ठ महाविद्यालयाने एच एस सी बोर्ड परीक्षे मध्ये घवघवीत यश मिळवले,
   एच एस सी बोर्ड परीक्षे मध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करत कॉलेजची परंपरा कायम ठेवली. यावर्षी कला, वाणिज्य व विज्ञान तसेच किमान कौशल्य शाखेचा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय चा सरासरी निकाल 90 . 71 टक्के लागला . शाखा निहाय निकाल विज्ञान शाखेचा 92. 89 टक्के ,कला शाखेचा 87 . 58 टक्के ,वाणिज्य शाखेचा 90. 86% निकाल लागला आहे कला शाखेतून शेख सबात फातेमा  अब्दुल रहीम  हिने 94.61 टक्के गुण घेऊन  तालुक्यातून प्रथम  येण्याचा मान मिळवला
 कला शाखा
 शेख सबात फातेमा अब्दुल रहीम 94.61% घेऊन प्रथम तर तीबोले प्रियंका ज्योतिबा 84% घेऊन द्वितीय व घुले अजय चोकोबा 80 टक्के घेऊन कॉलेजमध्ये तृतीय येण्याचा मान मिळवला.
 विज्ञान शाखा
  गाडे प्रतीक्षा अरुण हिने 78. 76% गुण घेऊन कॉलेजमधून प्रथम येण्याचा मान मिळवला तसेच शेळके विक्रांत बाबुराव 76 .46 टक्के घेऊन दृतिय, व पवार शोतेन सुनील 70 .46 टक्के गुण घेऊन कॉलेजमधून तृतीय येण्याचा मान मिळवला
वाणिज्य शाखा 
लोमटे प्रेरणा सतीश 90. 61 टक्के गुण घेऊन प्रथम तर वाघमारे गायत्री नानाभाऊ 88 .76 टक्के घेऊन द्वितीय व अकुस्कर सायली योगीराज 87 . 53 टक्के गुण घेऊन  तृतीय येण्याचा मान मिळवला
 किमान कौशल्य 
 ऑटो इंजिनीअरिंग मधुन इंगोले गणेश विश्वनाथ 74. 45 हॉर्टिकल्चर मधून पवार अमृता गोरख 71 .38 तर इलेक्ट्रॉनिक्स मधून मते पांडुरंग आश्रुबा 68.92 टक्के गुण घेऊन  प्रथम येण्याचा मान मिळवला
 या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनिल पवार उपप्राचार्य घोलप सर ,उपप्राचार्य आर. एन. गोरमाळी, प्रा एन. जे .टेकाळे,प्रा व्हि. आर. अडसूळ,प्रा. डॉ एच. एल .चौधरी,प्रा. पी. यु.शिंदे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले

 
Top