तुलजापूर  /प्रतिनिधी-
 शहरातील कणे गल्ली  भागातील  एका  ६५ वर्षिय व्यक्तीचा रिपोर्ट कोराना पाँजिटीव्ह आल्याने सदरील परिसर प्रशासनाने गुरुवार दि16 रोजी सकाळ सील केला आहे.सदरील व्यक्ती चा संपर्कातील अकरा जणांना क्वारटांईन केले आहे.तिर्थक्षेञ तुळजापूरात कोरोना बाधीत  रुग्ण आढळु लागल्याने प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.
या भागात यापुर्वी दोन रुग्ण आढळले होते हा तिसरा रुग्ण असल्याने हा परिसार कोरोना रुग्णांचा हाँटस्पाँट बनण्याचा मार्गावर आहे. सध्या शहरातील स्थानिक मंडळी कोरोना बाधीत आढळु लागल्यानै   शहरासाठी कोरोना रुग्णा धोक्याची घंटा बनत चालले आहेत. सध्या शहारातील कणे गल्ली व एस टी काँलनीतील कोरोना बाधीत आढळलेला रुग्ण भाग कंटेनमेंट झोन झाला आहे.सदरील व्यक्तीस सोमवारी उपचारासाठी दाखल केले होते त्यावेळी त्याचा स्वँब घेतला होता त्याचा रिपोर्ट गुरुवार दि16 रोजी आला असुन त्यांच्यावर उपजिल्हारुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत
या पुर्वी तुळजापूर येथे पुणे रिटन गर्भवती महिलेस कोरोना झाला होता तिच्यावर उपचार केल्यानंतर ती बरी होवुन घरी गेली होती नंतर कासार गल्लीत तीन आढळले त्यापैकी ऐका वृध्दाचा मुत्यु झाला नंतरएस टी काँलनी नंतर  कणे गल्ली  भागात ऐक महिला आढळली नंतर त्या भागा शेजारी हा रुग्ण बाधीत निघाला आहे शहरात आजपर्यत सात रुग्ण बाधीत आढळले आहेत दोन बाहार गावचे असुन पाच स्थानिक आहेत,कणे गल्ली परिसरात सध्या कोरोना बाधीत रुग्ण सापडू लागले आहेत
एस टी काँलनी कंटेनमेंट भागात दुध व भाजापाला वाटप
एस टी काॅलनी तुळजापूर येथे कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने  या प्रभागाचे नगरसेवक  विशाल  रोचकरी यांनी संपूर्ण परिसर स्यानिटायजर  करुन घेवुन करण्यात आला. सर्व परिसर साफसफाई व स्वच्छ करून पावडर टाकण्यात आली. सर्व परिसरात आरसेनिक आल्बम 30 गोळ्या व तसेच दुध व 8 दिवस पुरेल एवढा भाजीपाला वाटप करण्यात आला.
 
Top