उस्मानाबाद / प्रतिनिधी-
मा. पोलीस अधीक्षक राजतिलक  रौशन यांच्या संकल्पनेतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक गाव - एक पोलीस संकल्पना राबविण्यात येत आहे. त्या नुसार वाणेवाडी गावामध्ये पूजा स्वामी मॅडमची नेमणूक करण्यात आली आहे. पूजा स्वामी यांनी शुक्रवार दि 31 जुलै 2020 रोजी वाणेवाडी येथे भेट दिली. नागरीकांना प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करण्याचे आवाहन दिले.
यावेळी पोलीस पाटील मनिषा घेवारे, सरपंच प्रतिभा सरवदे, उपसरपंच प्रमोद उंबरे, ग्रामपंचायत सदस्य गोपाळ कदम, व सुभाष हिंगमिरे, आशा स्वयंसेवीका राजश्री उंबरे, ग्रामसेवक ओ, एस, गिरी  व इतर मान्यवर प्रदिप घेवारे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
 
Top