उस्मानाबाद  / प्रतिनिधी-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याचा निषेध नोंदविण्यात आला.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.२२ जुलै रोजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात शपथविधीच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व आई तुळजाभवानी मातेचे नाव घेऊन जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा केली. त्यावेळी व्यंकय्या नायडू यांनी या घोषणेबद्दल नाराजी व्यक्त करत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना हे माझे चेंबर आहे आपले घर नाही असे सुनावले व भविष्यात अशी कृती करू नये असे बजावले. यावरून असे दिसून येते की, भारतीय जनता पक्ष व या पक्षाचे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा फक्त निवडणुकीत मते मागून सत्तेवर येण्यासाठी वापर करत असल्याचे दिसून येते.
भाजप व त्यांच्या नेते मंडळीचा महाराष्ट्र राज्य, छत्रपती शिवाजी महाराज व आई तुळजाभवानीबद्दल असलेले बेगडी प्रेम त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. याप्रकाराचा शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील, उमरगा-लोहाराचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी, नगसेवक तथा पालिका गटनेते सोमनाथ गुरव, नगरसेवक अक्षय ढोबळे, शहराध्यक्ष पप्पू मुंडे, विभाग प्रमुुुख संजय खडके, बापू ढोरमारे, आमोल मुळे, हरिश्चंद्र मगर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 
 
Top