उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
जिल्ह्यात शनिवारी (दि.११) आलेल्या स्वॅब अहवालात नव्याने १९ काेरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. यामध्ये तात्पुरत्या कारागृहातील ६ कैद्यांसह शहरातील एका पत्रकाराचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३५४ वर पोहचला आहे. धक्कादायक म्हणजे उस्मानाबाद शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर असून अद्याप शनिवारी सकाळी पाठवलेल्या स्वॅबचे अहवाल येणे बाकी होते.
उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असल्याचे चित्र आहे. पहिल्या दोन महिन्यात एकअंकी संख्येवर असलेल्या काेरोनाबाधीतांच्या संख्येने नंतरच्या काळात शतकोत्तर वाटचाल केली आहे. शहरातील म्हाडा कॉलनी, महात्मा गांधी नगर, रामनगर, उस्मानपुरा, झोरी गल्ली, काळा मारुती चौक, बोंबले हनुमान चौक, नेहरू चौक, पापनाशनगर असे एक ना अनेक कंटेनमेंट झोन शहरात तयार झाले आहेत. त्यातच शनिवारी आणखी नवीन १९ रुग्णांसह दोन कंटेनमेंट झोनची भर पडली. शनिवारी सायंकाळी आलेल्या अहवालामध्ये उस्मानाबादच्या तात्पुरत्या जेलमधील ६ कैद्यांसह रामनगर व नेहरू चौक परिसर येथील प्रत्येकी एक, उस्मानाबाद तालुक्यातील शेकापूर-१, तुगाव-१, उमरगा शहर-३, मुरूम-१, भूम तालुक्यातील वालवड-१, राळेसांगवी-४ अशा एकूण १९ जणांचा समावेश आहे. यामध्ये एका पत्रकाराचा समावेश असून या पत्रकाराच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात करण्यात आली.
तात्पुरत्या कारागृहातील ६ जणांना काेरोना
उस्मानाबाद शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाजवळील जुन्या डायट कॉलेजमध्ये नवीन येणाऱ्या कैद्यांसाठी तात्पुरते कारागृह उभारण्यात आले आहे. नवीन कैदी कोरोनाचा धोका नको म्हणून थेट कारागृहात न दाखल करता प्रथम या तात्पुरत्या कारागृहात क्वाँरंटाईन करून पंधरा दिवसानंतर मुख्य कारागृहात पाठविले जातात. यानुसार या तात्पुरत्या कारागृहात तब्बल ५० वर कैदी असल्याचे कळते. यामधील सहा जणांना कोरोनाची लागन झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांना विलगीकरण करून त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
परंडा शहरातील निजामपुरा गल्लीत एक कोरोना बाधीत रुग्ण सापडला. शहरात सापडलेल्या नव्या रुग्णाच्या सपर्कातील १७ लोकांना क्वारंटाइन करुन त्यांचे स्वॅब घेतले आहेत. पालिका प्रशासनाने शहरातील निजामपुरा गल्लीचा भाग सील केला आहे. शहरातील निजामपुरा येथील कोरोना बाधीत रुग्णाचे किराणा दुकान असुन तो आवारपिंप्री येथील बाधीत रुग्णाच्या संपर्कात आला होता.
कोठे किती रूग्ण
उस्मानाबाद जिल्हयात एकुण ११३ रूग्ण उपचार घेत त्यामध्ये उस्मानाबाद शासकीय रूग्णालयात २७, आयुर्वेदीक महाविद्यालय १२ , तुळजापूर उप जिल्हारूग्णालय २ , कळंब उपजिल्हा रूग्णालय २८ , उमरगा उपजिल्हा रूग्णालय ८ , विजय क्लिनिक उमरगा ८ , शेडगे हॉस्पीटल उमरगा २ याशिवाय जिल्हयाच्या बाहेर सोलापूर येथे ८ , लातूर येथे ५ , पुणे व बार्शी येथे प्रत्येकी एक-एक असे कोरोना बाधित ११३ रूग्ण उपचार घेत आहेत.