तेर / प्रतिनिधी
उस्मानाबाद - लातूर राज्य मार्गांवर तेर - पळसप  रोडवरील वाढलेल्या  दुतर्फा झाडीमुळे समोरून  येणारे वहान न दिसल्यामुळे तेर येथील वृध्द इसमाचा अज्ञात वहानाच्या धडकेत मृत्यू  झाल्याची घटना मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली .
 याबाबत अधिक माहिती अशी की उस्मानाबाद तालुक्यातील तेर या गावापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतराच्या वळणावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी असून या वळणावरच तेर येथील वृध्द शेतकरी रामभाऊ पांडुरंग खरात वय 70 वर्षे हे नेहमीप्रमाणे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेताकडे स्वतःच्या टी.व्ही एस स्कूटी क्रमांक. एम.एच.25 AM 1491 वरून शेताकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने  येणाऱ्या अज्ञात वहानाने दिलेल्या धडकेत रामभाऊ खरात हे गंभीर जखमी झाले. यावेळी रामभाऊ खरात यांना बेशुद्ध अवस्थेत तेर येथील ग्रामीण  रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने खरात यांना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच रामभाऊ खरात यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी  उशिरापर्यंत ढोकी पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. 
 
Top