उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 राज्यातील शेतकऱ्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेस मान्यता दिलेली आहे. खरीप हंगाम 2020 साठी पीक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दि. 31 जुलै 2020 ही आहे. पीक विमा योजना ही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के व नगदी पिकासाठी पाच टक्के या मर्यादेत ठेवण्यात आलेला आहे.
 पीक विमा भरण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन असल्याने शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या गर्दीमुळे संगणक बंद पडणे, विमा हप्ता व्यवस्थित भरला न जाणे यासारख्या इतर त्रुटी येवू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी  शेवटच्या आठवडयात होणारी गर्दी टाळून विहित मुदतीच्या आत आपले विमा प्रस्ताव ऑनलाईन करुन घ्यावे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवानी  ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे. ते पीक पेरल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र, सातबारा उतारा/आठ-अ, बँक पासबूक व आधारकार्ड यासह नजीकच्या बँक शाखेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्ता भरुन पिक संरक्षित करावे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा  योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, उस्मानाबाद व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, उस्मानाबाद यांनी केले आहे.

 
Top