तुळजापूर/प्रतिनिधी :-
 कोरोना व  आगामी शारदीय नवराञोत्सव पार्श्वभूमीवर येथील मुख्याधिकारी यांची बदली योग्य नसल्याची प्रतिक्रिया शहरवासियांनमधुन व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे  येथील नगरपरिषद चे मुख्याधिकारी अशिष लोकरे यांची झालेली बदली रद्द करण्याची मागणी पुढे येत आहे
तिर्थक्षेञ तुळजापूर येथील नगरपरिषदे मध्ये मुख्याधिकारी पदावर येण्यास बहुतांशी मुख्याधिकारी नाखुश असतात. अशा परिस्थितीत मुख्याधिकारी अशिष लोकरे यांनी येथे येवुन मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारला आपल्या वीस महिन्याच्या कार्यकळात त्यांनी प्रथमता प्रशासनास शिस्त आणली त्यानंतर त्यांनी शहर विकासाचा कामात लक्ष घेतले त्यांनी आपल्या  कार्यकाळात सातत्याने पाणी व पथदिवै पोटी सातत्याने  विजबिल थकबाकी पोटी सातत्याने  कट करण्यात येणारे प्रकार योग्य नियोजन करुन रोखले त्यात त्यांनी मागील वर्षी शारदीय नवराञोत्सव राञ -दिवस काम करुन कुठलीही भाविक शहरवासियांची गैरसोय होणार नाही याची  दक्षता घेत शारदीय नवरात्रोत्सव निर्विघ्नेपणे पार पाडला. कोरोना काळात तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील  कोरोना पाँजिटीव्ह रुग्ण निर्माण होवु न देण्यात त्यांचे काम मोलाचे ठरले बाहेरून तिर्थक्षेञ तुळजापूरात आलेले मंडळीच कोरोना पाँजिटीव्ह निघाले.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेचा महोत्सव पुर्व तयारी आता सुरु होणार असतानाच अचानक बदली करण्यात आली यामुळे शारदीय नवरात्रोत्सव तयारीवर याचा मोठा परिणाम परिणाम  होण्याची शक्यता आहे.नवख्या मुख्याधिकारी यांना माहीतीच नसल्यामुळे याचा परिणाम शारदीय नवराञउत्सव पुर्व तयारी होण्याची शक्यता असल्याने मुख्याधिकारी अशिष लोकरे झालेली बदली रद्द करण्याची मागणी शहरवासियांन मधुन केली जात आहे.

 
Top