तुळजापूर/प्रतिनिधी :-
 तालुक्यात आजपर्यत  खरीपाचे एकुण सरासरी  पेरणी 87565.72 क्षेञ असुन त्या पैकी आज पर्यत 75572 -हेक्टर क्षेञावर 86.30 टक्के पेरणी झाली आहे. तालुक्याची पावासाची सरासरी 802.34 मिमि असुन आजपर्यत 159 .4 मिमि म्हणजे अवघा 19 टक्के पाउस पडला आहे तो खरीप पिकासाठी अंत्यत तोकडा आहे.पण सध्य परिस्थितीत सलाईन दिल्या प्रमाणे पाऊस पडत असल्याने कसेबसे पिके तग धरुन आहेत. त्यामुळे खरीप पिके वाचण्यासाठी शेतकरी  दमदार पावसाची आतुरतेने वाट पहात आहे.
यंदा खरीप पिकात सर्वाधिक पेरणी ही  सोयाबीन ची झाली असुन  सोयाबीन चे सरासरी क्षेत्र 382 14.99 हेक्टर क्षेत्र असुन त्यापैकी 58649 हेक्टर क्षेत्रात 153.45 टक्के पेरणी आजपर्यत झाली आहे.  सर्वात कमी तीळाची 0.26 टक्के झाली आहे, मागील  बारा ते तेरा दिवसापासुन तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप  पेरणी संकटात सापडली आहे. येत्या काही दिवसात दमदार पाऊस पडणे खरीप पिकवाडीसाठी  गरजेचे बनले आहे . नाहीतर  पिके  धोक्यात येण्याची शक्यता आहे. आजपर्यत तालुक्यात  एकुण खरीप तृणधान्य 7.8%, कडधान्ये 51.77 , गळीत धान्य 140.75% अशी पेरणी झालेली आहे
 पेरणी झालेले क्षेत्र कंसात व  सरासरी व पेरणी क्षेत्र टक्केवारीत
भात (1257.69) 45 (3.58%), (खरीप ज्वारी (2028.91) 28 (1.34%), बाजरी (2043.65) 35 (1.71%) मका (9751.70) 930 (.9.54%), तुर( 16524)10540(63.78%), मुग (5669.95)22664 (40.04%),  उडीद (7802.29)2840640(36.40%), भुईमुग (1829.62)120(6.59%), तीळ (765.69)2(0.26%),सुर्यफुल (476.39)218(04.41.%), कारळ (208.04)10(04.81%), सोयाबीन (38214.99)58640 (153.45%), कापुस (70)12(17.14%)
 
Top