न्यायाधीश देऊ शकतात सरप्राइज विझिट!
 जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी जारी केले परिपत्रक
उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 कोव्हीड १९ ( कोरोना) उपचार करताना क्वारन्टाईन सेंटर्स, अलगीकरण कक्ष,प्रतिबंधीत क्षेत्र या ठिकाणी न्यायाधीश किंवा त्यांचे प्रतिनिधी अचानक भेट देऊ शकतात. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार  कारवाई केली जाऊ शकते.
 न्यायाधीशांच्या भेटी दरम्यान त्या त्या ठिकाणी नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी अनुपस्थित असल्याचे अथवा आपले कामकाज व्यवस्थितरित्या बजावत नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी / कर्मचा - यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल व त्यांचे विरुद्ध फौजदारी कार्यवाहीसह त्यांना सेवेतून काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल या बाबतचे परिपत्रक नुकतेच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी जारी केले आहे. त्यामुळे आता कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना सजगतेने काम करावे लागणार आहे. औरंगाबाद न्यायालयात  दाखल झालेल्या सुमोटो फौजदारी जनहित याचिकेच्या अनुषंगाने या सरप्राइज विझिट होऊ शकतात.
 
Top