तुळजापूर / प्रतिनिधी-
 शिवसेना मिञ परिवाराचा वतीने शहरातील कोवीड उपचार केंद्र व  काॅरँटाईन केलेल्या नागरिकांना भोजन देवुन त्यांना लवकर बरे व्हा असा दिलासा दिला. या उपक्रम चा शुभारंभ  शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम, अर्जुन साळुंखे यांच्या हस्ते अन्नदान  करून करण्यात आला.
यावेळी उपचार केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, दिनेश रसाळ,चेतन बंडगर,शंकर गव्हाणे, रोहित नागनाथराव चव्हाण,बालाजी पांचाळ,सिद्राम कारभारी उपस्थित होते. या उपक्रमा बाबतीत बोलताना  रोहीत चव्हाण म्हणाले की,  ८० टक्के  समाजकारण २० टक्के राजकारण या शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या शिकविणीचा आर्दश समोर ठेवुन हा उपक्रम राबवला असुन कोरोना ग्रस्त यांना माणसिक आधार देणे गरजेचे होते या अनुषंगाने माणुसकि नात्याने हा उपक्रम घेतल्याचे सांगून, या पुढे ही असेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 
 
Top