तुळजापूर / प्रतिनिधी-
येथील ओम साई माऊली चॅरीटेबल ट्रस्टवतीने कोरोना च्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल  प्रजासक्ती परिवाराचे  संस्थापक आनंद दादा कंदले यांना कोविड १९ योध्दा हा पुरस्कार देऊन ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत (पप्पू )काळे, पुजारी मंडळाचे माजी कोषाध्यक्ष  कुमार इंगळे, आठवन ग्रुपचे दत्ता गवळी ,भरत सोनवणे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सांघीक प्रयत्नामुळे मिळाल्याचे सांगुन पुढील काळात आपण  सर्वजण तुळजापूर शहर तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया , असे त्यांनी आवाहन केले. चंद्रकांत काळे यांनी प्रास्ताविक करताना पुरस्कारामागची पार्श्वभूमी सांगितले. दत्ता गवळी यांनी आभार मानले.

 
Top