कळंब - (शिवप्रसाद बियाणी )
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना या रोगाने धुमाकूळ घातला असून संपूर्ण देशासह महाराष्ट्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊन सुरू असताना सर्व कामे बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या लोकांनी जगायचे कसे? त्यांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेली असताना कोणीही उपाशीपोटी राहू नये.
याची दक्षता घेत कळंब तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार परवीन पठाण यांनी विविध संस्था दानशूर व्यक्ती कडून आलेले अन्नधान्याची किट खऱ्या गरजवंताना सोशल डिस्टन्स पाळत योग्य प्रकारे वाटप करणे,रेशनवर तात्काळ धान्य उपलब्ध करून देणे,रेशन कार्ड अपडेट करने,अशी अनेक काम चोखपणे पार पाडत आपले कर्तव्य अगदी चोख व प्रामाणिकपणे केली आहे.
याच कामाची दखल घेत जनहितार्थ सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित स्टार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष मन्सूर सय्यद, उपाध्यक्ष तौफिक तांबोळी,सचिव मियासाहब सय्यद यांनी परवीन पठाण यांना कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर केला.
हा पुरस्कार कळंब चे नायब तहसिलदार अस्लम जमादार,पत्रकार संघाचे विश्वस्त तथा नगरसेवक सतीश बप्पा टोणगे आणि स्टार महाराष्ट्र माझा न्युज चे तालुका प्रतिनिधी सलमान मुल्ला,पत्रकार अनिल गाडे, ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते कचरू मामा टकले,अमर मुल्ला,मोहसीन मुल्ला,राहुल यादव,राहुल हौसलमल आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी पुरवठा विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून परवीन पठाण यांचे अभिनंदन केले आहे.