उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
तालुक्यातील भंडारवाडी शिवारातील शेतात वहिवाट कब्जा ठरवण्यासाठी गेलेल्या पोलिस व शासकीय कर्मचाऱ्यांना अडथळा करून अर्जदार शेतकऱ्याला खुनाची धमकी देऊन दहशत निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडला.
चिखली येथील काशीनाथ हनुमंत भोजने यांची भंडारवाडी येथे शेती आहे. शेताच्या वहीवाट संरक्षणार्थ ढोकीचे हवालदार प्रकाश विठोबा राठोड अन्य शासकीय कर्मचाऱ्यांसह शेतात गेले होते. यावेळी काकासाहेब गणपत पाटील, संगमेष पाटील, कुणाल पाटील, शंकर पाटील, रोहीत पाटील या सर्वांनी अडथळा केल्यामुळे ढोकी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top