तुळजापूर /प्रतिनिधी-
 जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणाली द्वारे करण्याची मागणी  महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंच जिल्हा शाखा उस्मानाबाद यांनी जि. प मुख्यर्यकारी अधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे.
निवेदनात म्हटलं आहे की, शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला होणे अपेक्षित असताना गेल्या अनेक महिन्यापासुन 15 ते 20 तारखेला वेतन होत आहे, त्यामुळे शिक्षकांना अर्थिक अडचणी निर्माण होत आहे तसेच गृहकर्ज शिक्षक सोसायटी बँक विमा यांच्या कर्जाचे हप्ते वेळेवर जात नाहीत त्यामुळे जास्तीचे व्याज भरावे लागत आहे.त्यामुळे सीएमपी प्रणाली ध्दारे वेतन करावे, अशा मागणी चे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे ,राज्य कोषाध्यक्ष पवन सुर्यवंशी यांनी दिले आहे.

 
Top