तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील खडकी तांडा येथे बालविवाह झालेल्या मुलीवर होत असलेले अत्याचार थांबवण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन  करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की , दि. ११/६/२०२० रोजी खडकी तांडा पोस्ट देवकुरुळी येथे अल्पवयीन मुलींचे लग्न झाले आहे,लग्न होण्या अगोदर संबंधित यंत्रणेला माहिती मिळली असता संबंधित यंत्रणा तातडीने तिथे पोहोचली आणि होणारा बालविवाह रोखण्यात आला . त्यावेळी त्यांचा नातेवाईकांनी यंत्रणेला सांगितले की हे लग्न नसून केवळ साखरपुडा आहे हे एकताच पथक वापस गेले असता अल्पवयीन मुलींचा विवाह पार पडला तरी विवाह झालेल्या मुलीवर शारीरिक अत्याचार झालेले नाकारता येणार नाही यासाठी अल्पवयीन मुलींचे वैदयकीय तपासणी करून लग्नासाठी उपस्थिती असणाऱ्या लोकांवर योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी   मिथुन सुखदेव जाधव यांनी निवेदन देवुन केली आहे.
 
Top