तुळजापूर /प्रतिनिधी-
 महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दरबारातील मृत्तिका, कल्लोळ तीर्थ व गोमुख तीर्थातील तीर्थ अयोध्या येथील रामजन्मभूमीच्या मंदिर निर्माण कार्यास विश्व हिंदू परिषद उस्मानाबाद मार्फत तुळजाभवानी महाद्वार व आई जगदंबेने श्रीरामप्रभुना जिथे वरदान दिले त्या घाटशीळ व रामवरदायिनी येथे पूजन करून पाठवण्यात आली.
यावेळी या मृत्तिकेचे व तीर्थाचे पूजन महंत मावजीनाथ बाबा व महंत व्यंकट अरण्यगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. देशभरातून अनेक तिर्थक्षेत्रातून मृत्तिका व तीर्थ राम जन्मभूमी येथे सुरू होत असलेल्या मंदिर निर्माण कार्यात पाठवले जात आहे त्याचाच भाग म्हणून आज हे तीर्थ व मृत्तिका विश्व हिंदू परिषद उस्मानाबादच्या वतीने अायोध्येस पाठवले जात आहे.
या पूजनाच्या वेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री श्रीकृष्ण धर्माधिकारी, विंहिंप बजरंग दलाचे धाराशिव जिल्हा संयोजक अॅड विक्रम साळुंके, विंहिंप जिल्हाध्यक्ष श्री दत्तात्रय चौरे, जिल्हा सहमंत्री परमेश्वर शिंदे, हभप बाबुराव महाराज पुजारी, तुळजापूर प्रखंड अध्यक्ष प्रा. काकासाहेब शिंदे, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक अर्जुनअप्पा साळुंके, मातृशक्ती जिल्हा संयोजिका सौ. प्रभावती मार्डीकर, तुळजापूर दुर्गावाहिनी प्रखंड संयोजिका कु. श्रध्दा ठाकूर, यांची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top