तुळजापूर / प्रतिनिधी-
केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, नवी दिल्ली .(अर्थात सी .बी .एस.ई) यांच्या मार्फत मार्च -एप्रिल 2020 बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत येथील जवाहार नवोदय विद्यालयाचा  निकाल  शंभर टक्के लागला आहे.
या परीक्षेसाठी विद्यालयातून ३७ विद्यार्थी बसले होते. सर्व ३७ विद्यार्थी प्रथम व विशेष श्रेणीमध्ये पास झाले आहेत. वैभव केमदारणे या विद्यार्थ्यांने जीवशास्त्र विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत. वैभव रघुनाथ केमदारणे. ९६ टक्के : प्रथम क्रमांक, अक्षदा उत्तम पाटील. ९३.४० टक्के: द्वितीय क्रमांक,  रोहित सचिन पवार.९२.४० टक्के :तृतीय क्रमांक; पटकावला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे चेअरमन व उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, विद्यालयाचे प्राचार्य श्री .के .वाय .इंगळे, उपप्राचार्य, श्री एस .वी .स्वामी, विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद, मार्गदर्शक शिक्षक,पालक शिक्षक समितीचे सर्व सदस्य या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक करून पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 
Top