वाशी / प्रतिनिधी -
वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे कोरोनाचा 1 पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. रुग्ण आढळताच प्रशासन तत्परतेने कामाला लागले असून त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे.शुक्रवारी रात्री पॉजिटिव्ह आढळलेल्या  रुग्णाच्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या 7 जणांना हाय रिस्क (जोखीम) लोकांना कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. त्यातील 5 व्यक्तींना वाशी येथील कोविड केअर सेन्टर मध्ये कॉरेन्टाईन करण्यात आले आहे.
कुटुंबातील 1 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यानंतर त्याच कुटुंबातील हाय रिस्क असलेल्या 5 व्यक्तींना वाशी येथे तपासणी साठी दखल केल्याची माहिती आहे.
200 मिटर पर्यंत चा परिसर सिल
ज्या भागात हा रुग्ण आढळून आला आहे त्या मारुती मंदिर रोड वरिल मुख्य  भागापासून 200 मीटरचा परिसर सिल केला गेला आहे.   कुणीही अफवा पसरवू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मॅसेज व अफवा पसरवू नये, अनावश्कय गर्दी करू नये, शासनाने दिलेल्या गाईडलाईऩचे पालन करावे असे आवाहन वाशी चे तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे यांनी केले आहे.ह्यावेळी तहसीलदार संदीप राजापुरे ह्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.

 
Top