तेर / प्रतिनिधी
 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील पेठ भागात तेरणा नदीच्या काठावर असेलेल्या स्माशानभूमीच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या जनसुविधा विशेष योजनेतील ७ लाखांचा निधीतून स्मशानभूमीतील विविध विकासकामे पुर्ण करण्यात आल्याने स्माशानभूमीच्या सौंदर्यात चांगलीच भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ,उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे पेठ भागात  तेरणा नदीच्या काठावर असलेल्या स्माशानभुमीची गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अवकळा आली होती. परंतु   जनसुविधा विशेष योजनेतील सात लाखांचा निधीतून येथील स्माशानभुमीमध्ये  अंत्यविधीसाठी नागरिकांना येणाऱ्या अडचणी दुर केल्या असून नागरिकांना स्मशानभूमीत बसण्यासाठी शेड उभारुन त्याठिकाणी बाकडे टाकण्यात आले आहे  तसेच संपूर्ण स्मशानभूमी परिसरात  सिमेंट कॉक्रीट करुन वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे स्मशानभूमीच्या सौंदर्यात भर पडली आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे विशेष म्हणजे पेठ भागातील स्माशानभूमीचा ज्या प्रकारे काया पालट केला आहे त्याप्रमाणे गावातील सर्वच स्माशानभूमीत सर्व.    सुविधेसह विकास कामे करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे .

 
Top