उस्मानाबाद/ प्रतिनिधी -
 जिल्हयात वाढता कोरोना सद्भाव आणि दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या व मृत्यूंची संख्या वाढतच चालली आहे. हे वाढते प्रमाण जिल्हावासीयांसाठी चिंतचे टरत असून लोकांत भीतीचे वातावरण आहे. अशा या भयंकर परिस्थितीमध्ये पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेण्याची मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले आहे
कोरोना संकटाच्या या भीर परस्थितीत पहिला लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आजतागायत एकदाही लोकप्रतिनिधी समवेत प्रशासनाची घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपाययोजना संदर्भात विचारविनिमयाची बैठक झालेली नाही. लोकप्रतिनिधी स्वतःहून सामाजिक दायित्वाच्या जाणीवेतून प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेऊन कार्यरत आहेत मात्र प्रशासनाचा लोकप्रतिनिधी समवेत समन्वयाचा अभाव असून लोकप्रतिनीधींना विश्वासात न घेता प्रशासन मनमानीपणे कारभार करत असल्याचे जिल्हयात चित्र आहे. यामुळे प्रशासनावर नियंत्रण कोणाचे हा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हयातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती दिवसेंदिवस वाढतच असून जिल्हयात कोरोना वाधीत रुग्णांची संख्या ४१८ झाली असून १७ जणांचे मृत्यू झाले आहेत. परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे.
जिल्हयातील कोरोना प्रादुर्भावाशी मुकाबला व उपाययोजना यावर विचार विनिमय तसेच शासनाने 'आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत कोव्हिड-१९ साठी खर्चास मान्यता दिलेला निधी खर्च, शेतक-यांच्या संबंधाने निर्माण झालेले प्रश्न,निधी उपलब्धता व खर्च आणि जिल्हयातील विविध महत्वाच्या व गंभीर प्रश्नावर लोकप्रतिनिधींची आपल्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेण्यात यावी , अशी मागणी केली
 
Top