उस्मानाबाद/प्रतिनिधी-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना सन 2019-20 अंतर्गत निवड झालेले उस्मानाबाद तालुक्यातील बेगडा येथील लाभार्थी सुशांत देविदास सोनवणे यांच्या शेतात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते दि. 2 जुलै, 2020 रोजी 267 सिताफळ रोपे लागवड करण्याचा शुभारंभ करण्यात आला.
तसेच शेवगा बियाणे वाटप व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजने अंतर्गत विहिरीतील पाण्याचे जलपूजन देखील करण्यात आले.
यावेळी अभिसरण पध्दतीने ठिंबक सिंचन संचाची आस्थापित केल्यानंतर पाहणी केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत नविन विहिर योजनेचा लाभ दिल्यानंतर त्याची पाहणी केली. बांधावर लागवडीसाठी शेवगा बियाणे वाटप, बांधावर फळबाग रोपे लागवड पाहणी, विहिरीस पुनर्भरण केल्याची पाहणी केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी डॉ.टी.जी. चिमनशेटे यांनी केले. यावेळी कार्यक्रमास जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) प्रमोद राठोड]उस्मानाबाद पंचायत समितीचे कृषि अधिकारी संजय दराडे, भोईनवाड आर.व्ही. व शेतकरी उपस्थित होते.