उमरगा/प्रतिनिधी-
 तालुक्यात कोरोनाचा विळखा वाढत आहे. मंगळवारी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ४७ झाली आहे.बुधावारी तालुक्यातील दाळिंबच्या रुग्णाच्या संपर्कात आलेली त्याची बहीण,व भाचा असे दोघांचा अहवालात पॉझिटिव्ह आला आहे मात्र ते दुसऱ्या गावातील आहेत.पुण्याहून कोरोना रुग्णाला घेऊन आले.तर तलमोड येथील एक पॉझिटिव्ह रुग्ण हा ड्रायव्हर असून त्याने सोलापूर येथे आपले वाहन घेऊन गेला होता तर उर्वरित सात जण उमरगा येथील आहेत.अहवालात बेडगा आहे.मात्र ते दोघे उमरगा येथे राहत आहेत आणि इतर पाच उमरगा येथील असुन त्यात कांही दवाखान्यात काम करणारे कर्मचारी आहेत.त्यामुळे बुधवारी दिवसभर संबंधित परिसर शील करण्याची कार्यवाही चालू होती.
 तालुक्यातील दाळिंब येथील ग्रामपंचायत कार्यालया जवळपास असलेल्या जाधव यांच्या प्लॉटींग कडे जाणारा रस्ता शील करण्यात आला आहे.तर तलमोड येथील मुस्लिम गल्ली शील केली आहे. उमरगा येथील शिवपुरी रोड, ब्रम्हपुरी कॉलनी, पतंगे रोड अजय नगर दक्षिण बाजू, मुकबधीर शाळा बालाजी नगर या ठिकाणचा परिसर शील केला आहे.आठ दहा  दिवसांपासून कोरोनाचे  रूग्ण झपाट्याने वाढत आहेत.त्यामुळे रुग्ण संख्या जास्त  पॉझिटिव्ह आल्याने उमरगेकरांना धक्का बसला आहे. दहा तारखेपर्यंत नगर पालिका व पोलिस प्रशासनाने शहरात होणारी नागरीकांची गर्दी, कमी करण्यासाठी बंद पुकारला होता आत्ता पुन्हा रुग्ण वाढत आहेत.त्यात व्यापा-यांची बेफिकिरी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोनाचा विळखा वाढतो आहे. शहरातील दोन खाजगी रुग्णालयातील कर्मचारीच कोरोनाबाधित आढळल्याने शहरातील तीन रुग्णालये सिल करण्यात आली आहेत तर अनेक रुग्णांलये अघोषित बंद आहेत.त्यामुळे इतर आजाराच्या रुग्णाला उपचार मिळणे कठीण झाले आहे.कोणत्याही दवाखान्यात रुग्ण आल्यास डॉक्टर नाहीत,दवाखाना बंद आहे असे सांगितले जाते त्यामुळे नागरिकांना पुन्हा भीती जाणवत आहे.काल आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या अहवाला नंतर हाय रिस्क मधील व कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दाळींब येथील पाच व्यक्तीला आणि तलमोड येथील दहा व्यक्ती ला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.दरम्यान बुधवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले,उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले,तहसीलदार संजय पवार,गटविकास अधिकारी डॉ.अमित कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुहास साळूखे,पोलीस निरीक्षक नागनाथ घागडे,
आदींनी दाळिंब,तलमोड गावास भेट दिली या वेळी दाळींबचे सरपंच बालाजी कांबळे, ग्रामविकास अधिकारी भास्कर वैराळे आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य सेवक यांनी पहाणी करून येथील परिसर शील केला आहे.

 
Top