परंडा / प्रतिनिधी :-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उस्मानाबाद तालुक्यातील बावी गावचे सुपुत्र अरुण विलास उंडे यांची उपजिल्हाधिकारी पदासाठी पात्र ठरल्याबद्दल आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी परंडा येथील भाजपा संपर्क कार्यालयात सत्कार केला.
अरुण उंडे यांचे प्राथमिक शिक्षण हे बावी येथील जि.प. शाळेत झाले, माध्यमिक शिक्षण हे सैनिकी शाळा तुळजापूर येथे झाले आहे. उंडे हे बी.ई. (इलेक्ट्रॉनिक) असुन अत्यंत हालाखीच्या परस्थिती वर मात करून उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, शहराध्यक्ष अॅड. जहीर चौधरी, विठ्ठल तिपाले, निशिकांत क्षिरसागर, सुखदेव टोंपे, अमोल घोळवे, सागर पाटील उपस्थित होते.
 
Top