परंडा प्रतिनिधी : -
दि.२ रोजी भारतीय स्टेट बँक मंडई पेठ (SBI) शाखा परंडा अंतर्गत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मधील (MJPSKY) ४१७ शेतकरी लाभार्थी यांची कर्ज माफी यादी जाहीर झाल्यानंतर राज्य शासनाने तात्काळ थेट शेतकऱ्यंाच्यां खात्यात पिक कर्ज निधी जमा केला.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज माफी यादी मधील ४१७ शेतकरी लाभार्थी पैकी भारतीय स्टेट बँक मंडई पेठ शाखा परंडा अंतर्गत आज रोजी १७३ शेतकरी लाभार्थी यांना तात्काळ २ कोटी ५ लाख रुपये खरीप हंगाम करीता शेतकर्याच्यां खात्यात जमा केले. यातील भोंजा हवेली मधील २२ शेतकरी लाभार्थी यांना आज रोजी पर्यंत रक्कम जमा केली असुन आज रोजी (MJPSKY) मधील शेतकरी लाभार्थी वाल्मीक येडबा कोळी यांना आज खरीप हंगाम पिक कर्ज रक्कम पञ बॅंक मॅनेजर अखिल प्रकाशसिंग रौथान याच्या हस्ते देऊन शेतकर्याचां गौरव करण्यात आला. यावेळी फिल्ड आॅफिसर अजिनाथ माळवदे , अभयसिंह मोहिते, महेशराव पाटील, उमेद चे लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, गजानन आगरकर , दिपक कोळी यावेळी उपस्थित होते. 
 
Top