लोहारा/ प्रतिनिधी
कोरोना – 19 विषाणूंचे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने सर्व नागरीकांना तसेच दुर्धर आजारग्रस्त व्यक्तीं ज्यामध्ये कर्करोग, एचआयव्ही एड्स, मधुमेह, हायपर टेन्शन, अस्थमा, ह्यदयविकार इ. व्यक्तींनी काळजी घेणे आवश्यक आहे. सदर व्यक्तींनी अत्यावश्यक गरजेसाठीच घराबाहेर पडावे व प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे -  उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी विठ्ठले उदमले यांनी केले.
उमरगा व लोहारा तालुक्यात कोरोना बाधीत क्षेत्रातून आलेल्या नागरीकांची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी. तसेच नागरींकामध्ये कोरोनाची लक्षणे उदा. ताप, सर्दी, श्वसनास त्रास, खोकला, अशक्तपणा इ. दिसून येत असल्यास त्यांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जावून आपली स्वास्थ तपासणी करुन घ्यावी. तसेच बाहेर फिरताना तोंडाला मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. तथापि वरिल बाबींचे उल्लंघन केल्यास संबधित नागरीकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897, महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार कारवाई करणेत येईल. तरी उमरगा व लोहारा तालुक्यातील नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे, आवाहन विठ्ठल उदमले, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी उमरगा यांनी केले आहे.
 
Top