उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कृषि संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने बुधवार, दिनांक 1 जुलै, 2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजनेतील लाभार्थीसाठी झूम अॅपद्वारे ऑनलाईन फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. तुळजापूर येथील उद्यानविद्या विभाग कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा.गणेश मंडलिक यांनी मुख्यत्वे आंबा, सिताफळ पेरु लागवड या विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास 30 लाभार्थी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये फळबाग शंका व आडचणी यावर चर्चा करण्यात आली. हा कार्यक्रम कृषि विकास अधिकारी, कृषि विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला व जिल्हा कृषि अधिकारी पी.जी राठोड यांनी प्रास्ताविक करुन सर्वाचे आभार मानले