तेर/ प्रतिनिधी-
महिलांनी आपल्या परसबागेत विषमुक्त भाजीपाला  पिकवावा त्याचे मुल्यवर्धन करून गटशेतीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपक्रमाद्वारे आपली आर्थिक प्रगती साधाण्याची गरज  असल्याचे प्रतीपादन डॉ.वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवन यांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथे कृषी संजीवनी सप्ताहातर्गत आयोजित महिला शेतीशाळेतील महिलांशी  डॉ. धवन संवाद साधला  होता. यावेळी उस्मानाबाद चे तालुका कृषी अधिकारी डी.आर. जाधव, कृषी विद्यालय उस्मानाबादचे प्राचार्य  डॉ.राकेश अहिरे, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर चे कार्यक्रम समन्वयक  प्रा.सचीन सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बचत गटाबरोबरच पुरक जोडधंदा उभारण्याची गरज असल्याचे मतही कुलगुरू डॉ. धवन यांनी  यावेळी व्यक्त केले.  तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी कृषी संजीवनी सप्ताह आयोजन करण्या मागील भुमिका स्पष्ट केली.
कृषी सहाय्यक वैभव लेणेकर यांनी महिला शेती शाळेची संकल्पना मांडली .कार्यक्रमास  कृषी मंडल आधिकारी सत्यजीत देशमुख ,डॉ.प्रवीण चव्हाण ,डॉ.महेश वाघमारे ,डॉ. किरण थोरात ,डॉ. राघवेंद्र पाटील , रेखा शिंदे  कोमल कटकटे, कौशल्या कटकटे यांच्यासह महिला शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

 
Top