उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हयातील नागरिक कोरोना संकटाचा मुकाबला करत असताना ज्यांच्यावर जिल्हयाचे पालकत्व आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक वेगवान करण्याची जबाबदारी आहे, ते जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख मात्र दोन महिन्यांपासून उस्मानाबादकडे फिरकलेच नाहीत. ज्यामुळे जिल्हा प्रशासनाचा कुणालाही कुणाचा पायपासे राहिला नाही अशी परिस्थिती आहे. कोरोनासारख जागतिक महामारीचा प्रादुर्भाव वाढत असताना पालकमंत्री गडाख मात्र आपल्याच मतदारसंघात रमले आहेत. त्यामुळे पालकमंत्री गडाख ‘गडप’ म्हणण्याची वेळ उस्मानाबादकरांवर आलेली आहे. त्यामुळे गडप’ पालकमंत्री गडाख यांच्या निषेधार्थ मनसेने पोस्टरबाजी द्वारे केला जाहिर निषेध करून आपला रोष व्यक्त केला आहे.
कुठल्याही जिल्हयातील विकास कामे, आरोग्य संबंधित प्रश्न, इष्ट आपत्तीच्या काळात तातडीने निर्णय घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री म्हणून जिल्हयाची जबादारी सोपवली जाते. एखादे नैसर्गिक संकट कोसळले तर अशावेळी पालकमंत्री हेच खऱ्या अर्थाने जिल्हयाचे प्रशासन हाकत असतात. पण कोरोना सारखे जागतिक संकट उस्मानाबादकरांवर ओढावलेले असताना जिल्हयाचे पालकमंत्री शंकरराव गडाख हे 26 मे रोजी जिल्हयात बैठक घेऊन जे गेले, ते अजून परतलेले नाहीत. ऐरवी ते आले नाही, बैठका घेतल्या नाही तर समजू शकते, पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यांनी जिल्हयाकडे दुर्लक्ष करणे कितपत योग्य आहे, असा सवाल म.न.से. उपस्थित करीत आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नासह अनेक गोष्टी पालकमंत्र्या अभावी रखडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे जिल्हयाची जबाबदारी सोपाविण्यात आली मात्र त्यांनी जिल्हयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. बैठकी पुरते जिल्हयात काही तासांच दौरा करुन ते निघून जात असल्याने उस्मानाबादकरांचा भ्रमनिरास होत आहे.
या अगोदर दुष्काळी परिस्थिती असायची आता जिल्हयासमोर कोरोनाचे संकट उभे टाकले आहे. अशा परिस्थितीत पालक म्हणून पालकमंत्र्याची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. पण 26 मे रोजी बैठक घेऊन गेलेले गडाख पुन्हा जिल्हयात आलेच नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी चौक येथे पोस्टरबाजी करुन जाहिर निषेध करण्यात आला.
यावेळी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे, विद्यार्थी सेनेचे सौरभ देशमुख, किरण ननवरे, पृथ्वीराज शिंदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.