तुळजापूर/ प्रतिनिधी-
कोरोना कालावधीत आलेल्या श्रावण मासातील पहिल्या सोमवारी दि.27 रोजी श्री शंभु महादेव मंदीरे प्रथमच  भाविकांनविना सुनसान दिसत होते. श्रावणी सोमवार पार्श्वभूमीवर पुजारी वृदांनी पहाटे मंदीरांन मधील महादेवास अभिषेक घालुन महाआरती केली नंतर धार्मिक वृत्तीच्या भक्तांनी दुरुनचदर्शन घेतले.
शहरातील शंभु महादेव मंदीरात शंभु महादेव पिंडीवर आकर्षक फुलांचा आरास केला होता. श्रावण निमित्ताने धार्मिक ग्रंथ, पोथी, वाचन गावोगाव मोठ्या प्रमाणात केले जाते. यातील बहुंताशी धार्मिक  कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे दिसुन आल्याने धार्मिक वृत्तीच्या लोकांनी घरीच ग्रंथ, पोथी वाचन केले. कोरोना रुग्णांचा वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात पुकारण्यात आलेल्या चार दिवसाचा जनता कर्फ्यु नंतर श्रावण मासाचा पहिल्या सोमवारी शहरातील दुकाने व्यापारी वर्गाने उघाडली होती. माञ श्रावण सोमवारमुळे  ग्रामीण भागातील मंडळी शहरात न आल्याने शहरातील रस्त्यावर वर्दळ कमी दिसत होती. फक्त तहसिल कार्यालय व बँका व जुन्या बसस्थानक चौकात वर्दळ दिसुन आली इतरञ माञ शहर  सुनसान पडले होते.

 
Top