उमरगा/ प्रतिनिधी-
पालिकेत शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाबाबत व त्यावर करावयाच्या उपाययोजना संदर्भात उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी उमरगा पालिकेत बुधवार दि 29 रोजी नगरसेवकांची बैठक घेत चर्चा केली.तसेच सूचना केल्या या बैठकीला पालिकेतील 25 नगरसेवकांपैकी 6 नगरसेवक उपस्थित होते. यामुळे कोरोनाबाबत नगरसेवकांची उदासीनता दिसून आली.
उमरगा शहरात गेल्या दहा बारा दिवसात कोरोना रुग्णाची संख्या सव्वादोनशे पार गेली आहे. मंगळवारी दि 28 रोजी तब्बल 46 रुग्णाची भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी मंगळवारी पालिकेतील सभागृहात नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला पालिकेतील 25 नगरसेवकापैकी फक्त 6 नगरसेवक हजर होते. तहसिलदार संजय पवार, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे,उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शहरातील कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी कोणकोणते उपाय करायचे याबाबत नगरसेवकांशी चर्चा केली व प्रशासना कडून केल्या जात असलेल्या उपाययोजनाची माहिती दिली. यावेळी लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णास घरीच ठेवण्याच्या निर्णयाचा नगरसेवक अतिक मुन्शी यांनी मुद्दा उपस्थित करीत हे रुग्ण घरीच राहून दुसऱ्याच्या संपर्कात न येण्याची खबरदारी घेतील का तसेच त्यांच्या घरी वेगळी बाथरूम व्यवस्था आहे का या बाबत विचारणा केली. तसेच शहरात दहा बारा सार्वजनिक सौचालय आहेत तेथे एक कर्मचारी तैनात करून तेथील स्वच्छता व सॅनिटायजरची व्यवस्था करण्याची सूचना केली.यावेळी उपविभागीय अधिकारी उदमले यांनी नगरसेवक मुन्शी यांना कोरोना रुग्णांना घरी ठेवण्यात येत असताना त्यांच्या कडून लेखी घेतली जात असून त्यांच्यावर कायम लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक सौचालयाच्या ठिकाणी सर्व खबरदारी घेण्याची सूचनाही पालिका प्रशासनास केली. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी कोरोनाच्या रॅपिड टेस्ट शहरातील दाट लोकवस्ती तसेच जेथे जास्त रुग्ण आढळून आले आहेत तेथे करण्यात याव्यात अशी मागणी केली. व शहरात जोडणारे सर्व रस्ते बंद करण्यात यावेत अश्या सूचना केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी उदमले यांनी नगरसेवकानी आपापल्या वार्डात पालिका सदस्यांनी स्वंयसेवक नेमावेत. त्यांनी घरोघरी जाऊन कोरोना संबंधी जनजागृती करावी, ऑक्सिमीटर द्वारे वार्डातील नागरिकांची तपासणी करावी. संधीग्ध वाटणाऱ्याना तात्काळ दवाखान्यात स्वबसाठी पाठवावे.ताप, खोकला, सर्दीचे लक्षण असणाऱ्यानी स्वतःहून स्वब नमुना देण्यासाठी जनजागृती करावी. शरीरात प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आहार नियोजनाचे महत्व नागरिकांना पटवून द्यावे. तसेच वार्डात कोण बाहेर गावाहून आले आहेत का यावर लक्ष ठेवावे. त्याची खबर प्रशासनस द्यावी असे आवाहन केले. सर्वांनी एकत्र मिळून काम केल्यास निश्चित कोरोनावर नियंत्रण मिळवू असे सांगितले.
या बैठकीला नगरसेवक अतिक मुन्शी,विक्रम मस्के,अरुण इगवे,गोविंद घोडके,इराप्पा घोडके,पंढरीनाथ कोणे उपस्थित होते तर शिवसेना व राष्ट्रवादी या दोनी पक्षाचे विरोधी पक्षनेते अनुपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते अशोक बनसोडे, अमर वरवटे,संदीप चव्हाण, महादेव पाटील व पालिका कर्मचारी उपस्थित होते .