उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित श्रीपतराव भोसले हायस्कूलने दहावीच्या निकालाची दैदीप्यमान यशस्वी परंपरा या वर्षीही कायम ठेवली आहे. मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात हायस्कूलने अभूतपूर्व यश संपादन केले असून सात विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत. श्रीपतराव भोसले हायस्कूलचे दहावीच्या परीक्षेसाठी  एकूण 1036 विद्यार्थ्यी बसले होते. त्यापैकी 1013 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हायस्कूलचा सरासरी निकाल 97.77% इतका लागला आहे.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी मोरे आदित्य हरिश्चंद्र, नलावडे चिराग संजय, कु.ढोले सुहानी सहदेव, कु.धावारे तनुजा काशिनाथ, कु.जाधव ॠतुजा रमेश, चव्हाण श्रेयश दत्तात्रय, कु.सपाटे भक्ती पोपट या सात विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले आहेत. 16 विद्यार्थ्यांनी 99% पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. 90% पेक्षा अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांची संख्या 193 एवढी आहे. 567 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
मिळवलेल्या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांचा पालकांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून संस्थेचे अध्यक्ष मा.सुधीर आण्णा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सुधीर पाटील यांनी शाळेच्या यशाचा चढता आलेख सांगितला. ते म्हणाले की, श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये ‘मागेल त्याला प्रवेश’ या तत्वानुसार सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. राज्यात सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असतानाही घवघवघवीत यश संपादन करणारी ही एकमेव शाळा असा श्रीपतराव भोसले हायस्कूलचा नावलौकिक आहे. ही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखण्यासाठी शाळेत उन्हाळी वर्ग, इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयाचे जादा तास, रात्र अभ्यासिका, सराव परीक्षा आयोजित केल्या जातात. त्याच बरोबर महाराष्ट्रातील विषय तज्ञांचे मार्गदर्शन, प्रत्येक महिन्याला तुकडीनिहाय पालक मेळावे,
तसेच वेगवेगळे अभ्यासपूरक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येते.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुरुवर्य के.टी.पाटील सर यांनी कौतुक केले. या सत्कार समारंभास शाळेचे मुख्याध्यापक श्री.साहेबराव देशमुख, उपमुख्याध्यापक श्री.सिध्देश्वर कोळी, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील,  उपप्रशासकीय अधिकारी श्री. संतोष घार्गे, माजी मुख्याध्यापक श्री. सुधीर पडवळ, पर्यवेक्षक श्री.यशवंत इंगळे, श्रीमती भारती गुंड, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम सामाजिक अंतर पाळून पार पाडण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.सूर्यकांत पाटील तर आभार श्री.सिध्देश्वर कोळी यांनी मांडले. मिळालेल्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top