उस्मानाबाद / प्रतिनिधी-
प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) पिक विमा ऑनलाईन भरण्याची अंतिम  मदुत 31 जुलै 2020 ही  आहे. पिक विमा ऑनलाईन भरताना ज्या शेतकऱ्यांचा सातबाराचा डाटा भूमी अभिलेख कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतानाही पिक विमा संकेतस्थळावर पडताळणी होत नाही. अशा शेतकऱ्यांचा पिक विमा सातबाराचा डाटा व्हेरिफीकेशनच्या अधीन राहून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत स्विकारण्यासाठी सुविधा उपलब्ध केलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांचा सातबाराचा डाटा विमा संकेतस्थळावर व्हेरिफाय होत नसल्यामुळे पीक विमा भरावयाचा राहिलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये जाऊन पीक विमा भरुन घ्यावा. बँकेमध्ये पीक विमा भरताना अर्जासोबत बँक पासबूक, आधार कार्ड,  सातबारा उतारा, पिक पेरा स्वयंघोषणापत्र व प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांच्या सातबाराचा डाटा विमा संकेतस्थळावर व्हेरिफाय होत नाही. अशा शेतकऱ्यांनी  नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखमध्ये जाऊन पीक विमा भरावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी उमेश घाटगे यांनी केलेले आहे.
 
Top