उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
16 जुलै रोजी सकाळी -10:30 व  दि. 15 जुलै रोजी सायंकाळी उशिरा, पूर्वीचे पेंडिंग असलेले 97 रिपोर्ट्स स्वा. रा. ती. ग्रा. शा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथून प्राप्त झाले, असून ते सर्व नेगेटिव्ह आले आहेत.
दि. 15/07/2020 रोजी सायंकाळी उशिरा, उस्मानाबाद शहरातील विविध क्वारंटाईन सेंटर मधील 81 संशयितांची रॅपिड अँटीजेन किट्स च्या माध्यमातून तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये 09 जण पॉजिटीव्ह आढळून आले .
रूग्णांची माहिती
1) 30 वर्षीय पुरुष, रा. खाजा नगर, उस्मानाबाद.
2) 39 वर्षीय पुरुष, रा. निंबाळकर गल्ली, उस्मानाबाद.
3) 42 वर्षीय पुरुष रा. काकडे प्लॉट, उस्मानाबाद.
4) 21 वर्षीय महिला, साईराम नगर, उस्मानाबाद.
5) 41 वर्षीय महिला, साईराम नगर, उस्मानाबाद.
6) 34 वर्षीय महिला रा. जेल क्वार्टर्स, उस्मानाबाद.
7) 45 वर्षीय महिला, रा. जेल क्वार्टर्स, उस्मानाबाद.
8) 27 वर्षीय महिला रा, जेल क्वार्ट्स, उस्मानाबाद.
9) 09 वर्षीय मुलगा रा, जेल क्वार्टर्स, उस्मानाबाद.
त्यामुळे आज सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण 09 कोरोना बाधितांची भर पडली आहे. आज पर्यंत जिल्ह्यतील एकूण रुग्ण संख्या 458.
 
Top