तुळजापूर/प्रतिनिधी :-
लाँकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीज बिल माफ करण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनच्या वतीने  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
निवेदनात म्हटलं आहे की, लाँकडाऊन काळातील वीज बिलात भरमसाट वाढ केलेली आहे. लाँकडाऊन काळात सर्व बंद असल्याने लोकांच्या हाताला काम मिळाले नाही, त्यामुळे ते सध्या अर्थिक संकटाचा सामना करीत असल्याने सर्वसामान्य वीज बिल भरु शकत नसल्याने ते माफ करावे व वीज माफीची रक्कम शासनाने महावितरण द्यावी . थकित वीज बिलाची वसुली सक्तीने करु नये ,सक्तीने वीज बिल वसुल केल्यास स्वाभीमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशाराच निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे व धनाजी पेंदे , सतिश सांळुके यांनी  दिला आहे. 
 
Top