परंडा /प्रतिनिधी : -
जबरी चोरी प्रकरणातील गेल्या ८ वर्षा पासुन फरार असलेला परंडा तालुक्यातील तांदुळवाडी येथील आरोपी  शहाजी कल्याण शिंदे, वय 32 वर्षे याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दि.१८ शनिवार रोजी अटक केली आहे . 
    आरोपी शिंदे वर  परंडा पोलिसात सन २०१२ साली जबरी चोरीचा  गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपी शिंदे याला अटक करून पुढील तपास कामी परंडा पोलिसाच्या ताब्यात दिले आहे.
सदरील  कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक  दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ- काझी, पोना- कुनाल दहीहांडे, पोकॉ- सर्जे, आर्सेवाड, महिला पोकॉ- होळकर यांच्या पथकाने केली आहे.

 
Top