कळंब / प्रतिनिधी-
राज्यातील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्या शिक्षक व विद्यार्थी हिताचा विचार करुनच केल्या जातील अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिली असल्याची माहीती शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे.
दि.१८ रोजी राज्याचे बदली धोरण व शिक्षकांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिका-या समावेत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या बैठकीत ना.मुश्रीफ बोलत होते .
या वेळी प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात ,प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, पुणे जिल्हासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, उस्मानाबाद जिल्हासंघाचे अध्यक्ष संतोष देशपांडे ,सातारा जिल्हासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत यादव व पदाधिकारी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षक संघाने मागणी केलेल्या सर्व विषयावर या वेळी चर्चा करण्यात आली त्यात प्रामुख्याने जिल्हापरिषद शाळेतील सन २०१८ व २०१९ मध्ये रेण्डम राऊंड ,विस्थापित होऊन व समायोजना मध्ये गैरसोय झालेल्या शिक्षकांची विनाअट बदली करण्यात यावी. या बदल्या करताना समानिकरणच्या नावाखाली रिक्त ठेवलेल्या जागा दाखवण्यात याव्यात ,प्रशासकीय कारणावरुन तालुका बाहेर बदली करण्यात येऊ नये, बदल्याची खो,खो पद्धत बंद करण्यात यावी, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या पदोन्नती करण्यात यावी, आंतरजिल्हाबदली साठी राज्य रोष्टर ग्राह्य धरावे, संगणक प्रशिक्षण नसलेल्या शिक्षकांची सेवानिवृतीच्या वेळी वेतनवाढ वसुली थांबवावी ,कोविड १९ संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात बदली प्रक्रिया आँनलाईनच राबवावी या बाबींवर चर्चा करण्यात आली.
या वेळी ना.मुश्रीफ यांनी सांगितले की आपण फक्त गैरसोय झालेल्या शिक्षकांच्याच बदल्या करु अनावश्यक बदल्या होणार नाहीत तसेच बदल्यात संपुर्ण पारदर्शकता असेल ,बदल्याची गरज असेल तरच आपण बदल्या करु.
शेवटी ना.मुश्रीफ यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी यांना बोलावून बैठकीत प्रश्नांची सोडवून केल्याबद्दल त्यांचे संतोष देशपांडे यांनी आभार मानले.