तुळजापूर / प्रतिनिधी-
येथील घाटशिळ घाटात ट्रक  मोटार सायकल यांच्यात झालेल्या धडकेत एक ठार तर एक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना रविवार दि.19 रोजी सांयकाळी साडेसहा वाजता घडली. हा अपघात इतका भीषण होता कि ट्रक घाटातच पलटी झाली तर मोटार सायकल घाट संरक्षक कटडा सोडुन बाजुला पडली होती.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, सोलापूर हून ट्रक (क्रमांक MH17BD7004)  हा घाटातुन तुळजापूरकडे येत होता तर मोटार सायकल (क्रमांक MH25AQ 1815) वरुन येत असताना घाटशिळ घाटात समोर- समोर हुन झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील विश्वभंर किसनराव कुलकर्णी (60) सिंदफळ  हे ठार झाले तर सिंदफळ येथील मनोज सुभाष शिंदे (29)  हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात रवाना केले आहे.

 
Top