नळदुर्ग /प्रतिनिधी -
नळदुर्ग शहरातील कोरोना विषाणू बाधीतांचा प्रसार लक्षात घेता आता गावकऱ्यांच्या निर्णयानुसार नळदुर्ग शहरात तीन दिवस जनता कफर्यू लागू करण्यात येणार आहे. मंगळवार दि. २३ ते शुक्रवार दि. २५ जून दरम्यान हा जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्हयात नळदुर्ग हा कोरोना हॉटस्पॉट होतो की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळे या पार्श्वभूमीवर पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री राउत यांच्यासह शहरातील नगरसेवक व प्रतिष्ठीत नागरीक व कांही व्यापारी आणि पत्रकार यांच्या सर्वांच्या एकमताने नळदुर्ग शहरात तीन दिवस जनता कफर्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाला शहरातील व्यापारी बांधवांनी सहाकार्य करावे असे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.
नळदुर्ग शहरात आता पर्यंत एकूण १३ कोरोना विषाणूने बाधीत झालेले रुग्ण सापडले आहेत, दरम्यान आणखीन हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यामुळे शहरातील कोरोना विषाणूचा संसार्गाचा वाढणारा धोका लक्षात घेवून व शहरातील वाढत्या रुग्णांची साखळी तोडण्यासाठी शहरात कमीत कमी तीन दिवसाचा तरी जनता कफर्यू लागू होणे अपेक्षीत होते. त्यासाठी नळदुर्ग शहरातील जयहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय बताले यांनी शहरातील सर्व नगरसेवक व प्रतिष्ठीत नागरीक व पत्रकार यांची पालिकेच्या परिसरात बैठक बोलावून घेतली. बैठकीत सर्वाच्या एकमताने शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात तीन दिवस तरी जनता कफर्यू लागू करणे हे जरुरीचे आहे म्हणून मंगळवार, बुधवार, गरुवार या तीन दिवशी शहरात कडक जनता कफर्यू लागू करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असून या साठी पलिका प्रशासन व पोलिस प्रशासन मदत करणार असून या जनता कफर्यूची काटेकोर पणे अमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाला आमचा पाठींबा असून आमच्या प्रशासनाकडून या जनता कर्फ्यूसाठी कर्मचाऱ्यांची लागेल ती मदत करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड व सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री राउत यांनी दिले आहे.
या बैठकीला नगरसेवक नय्यरपाशा जहागीरदार, शहेबाज काझी, उदय जगदाळे, नितीन कासार, महालिंग स्वामी, माजी नगरसेवक शरीफ शेख, सुधीर हजारे, सामाजिक कार्यकर्ते अजहर जहागिरदार, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहर भाजपाचे अध्यक्ष पदमाकर घोडके, भाजयुमो चे शहराध्यक्ष श्रमीक पोतदार, सुशांत भूमकर, सामाजिक कार्यकर्ते सुनिल बनसोडे, शाम कनकधर, अमर भाळे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, जेष्ठ पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, विशाल डुकरे, संजय विठठल जाधव, नवल जाधव, प्रा.दिपक जगदाळे, जिलानी कुरेशी, व्यापारी उमेश नाईक, समीर बाडेवाले, आयुब शेख, गयाज जहागिरदार आदीसह नागरीक उपस्थीत होते.