लोहारा/प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर शिंदे गल्लीत राहणारे सहशिक्षक गिरजप्पा कावळे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संत कक्कय्या महाराज समाज संघटनेतर्फे सपत्नी सत्कार मंगळवारी (ता.२) रोजी करण्यात आला.
 गिरजप्पा कावळे यांनी कोथळी, ता.उमरगा येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक म्हणूनही सेवा केली. नुकतेच ते मुरुमच्या प्रतिभा निकेतन विद्यालयातून सहशिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव व मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. त्यांचा अध्यापनाचा विषय सामाजिकशास्त्र असल्याने त्यांनी समाजातील होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची अनेक वेळा मदत केली. संत कक्कय्या महाराज संघटनेचे सहसचिव म्हणून ते सध्या कार्यरत असून ते सतत विविध उपक्रमामध्ये सक्रिय असतात. या त्यांच्या सेवानिवृत्तीबद्ल संघटनेचे अध्यक्ष वसंत शिंदे, उपाध्यक्ष धनराज शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर शिंदे यांच्या हस्ते गिरजप्पा व सौ. जयश्री कावळे यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला. यावेळी विविध कार्यकर्त्यांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. तात्याराव शिंदे, खंडू सक्करगी, मल्लू हुलसुरे, शिवशंकर लुटे, संजू ढगे, बाबु कटके आदींनी शुभेच्छा दिल्या. सचिन शिंदे, राजेंद्र कटके, दत्ता शिंदे, रेवण कटके, महेश शिंदे, अंबादास शिंदे, प्रविण शिंदे यांनी पुढाकार घेतला. हिमाचल प्रदेश येथे अभियंता पदावर  कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शिंदे यांनी फोनवरून कावळे यांना सेवानिवृत्तीबद्ल हार्दिक शुभ कामना व्यक्त केल्या.  
 
Top