उस्मानाबाद /प्रतिनिधी-
स्वर्गीय लोकनेते पवनराजे निंबाळकर   यांच्या पुण्यतिथी निमित्त पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट समूहा मार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले.  या उपक्रमातंर्गत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप व उस्मानाबाद येथिल अन्नछत्र या ठिकाणी मोफत अन्नदान तसेच नगरपालिका उस्मानाबाद येथे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड व मास्क चे वाटप करण्यात आले. असे विविध उपक्रम पुण्यतिथी निमित्त  राबवून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या विविध कार्यक्रमास उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदर कैलास घाडगे-पाटील, तालुका प्रमुख सतिषकुमार सोमाणी, पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेटचे चेअरमन जयप्रकाश राजेनिंबाळकर, उस्मानाबाद नगरचे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, नगरपालिका गटनेते सोमनाथ गुरव, नगरसेवक बाळासाहेब काकडे, अक्षय ढोबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी मुखीम सिद्दिकी, जनरल मँनेजर प्रशांत सुलाखे, फिरोज शेख, सुरज महाडिक, ज्ञानेश्वर भोसले, सूर्यकांत गाढे, तसेच जिल्हारुग्णालयचे डॉक्टर्स, कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी आदी उपस्थित होते.
 
Top