उस्मानाबाद/प्रतिनिधी
 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात आज दि.२१जून रोजी ,महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या पुतळा परिसरात सकाळी साडेसात वाजता “आंतरराषट्रीय योग दिन” एन.एस.एस.विभागाचे वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत महाविद्यालयातील निवडक प्राध्यापकांनी योगाचे विविध प्रकार केले यावेळी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी ही सहभाग नोंदवला याचे नियोजन प्रकल्प अधिकारी प्रा.श्रीराम नागरगोजे व प्रा.माधव उगीले,राहूल जगताप यांनी केले होते मार्गदर्शक म्हणून प्रा.आर.एस.देशमुख होते.
यावेळी प्रा.हनुमंत साळुंखे,प्रा.राजा जगताप,प्रा.संदिप देशमुख,प्रा.मंगेश भोसले,डाॅ.विकास सरनाईक,प्रा.बालाजी कऱ्हाडे,प्रा.एस.पी.मोहिते, नागनाथ देशमुख यांनी योगा करण्यात सहभाग नोंदवला. महाविद्यालयातील इतर प्राध्यापक,कर्मचारी व सेवक यांनी आपआपल्या घरातच सकाळी योगा दिन साजरा केला.

 
Top