कळंब ( भिकाजी जाधव ) -
राज्याच्या विधानपरिषदेत प्राथमिक शिक्षकांचे,विद्यार्थी व शाळेचे प्रतिनिधी म्हणून शिक्षक नेते श्री.संभाजीराव थोरात संधी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली असल्याची माहीती शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे ,राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार व राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष ना.जंयत पाटील यांना शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की.राज्याच्या विधानपरिषदेत माध्यमिक ,उच्चमाध्यमिक व महाविद्यालय शिक्षकांचे राज्यातून सहा प्रतिनिधी घेतले जातात तसेच पदवीधर व इतर क्षेत्रातील प्रतिनिधी ही विधानपरिषदेत घेतले जातात पण प्राथमिक शाळेचा व शिक्षकांचा  प्रतिनिधी विधानपरिषदेत घेतला जात नाही म्हणून राज्यातील प्राथमिक शाळा ,विद्यार्थी व प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष होत आहे त्यांच्या प्रश्नाची विधानपरिषदेत मांडणी करुन  सोडवून करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांचा प्रतिनिधी विधानपरिषदेत असणे गरजेचे आहे .प्राथमिक शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून गेली ४५ वर्ष प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षक ,विद्यार्थी व शाळेचे प्रश्न अधिवेशन व अंदोलनाच्या माध्यमातून सतत शासन दरबारी मांडणारे व राज्यातील ३ लाख सदस्य असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते तथा राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.संभाजीराव थोरात यांना राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव शासनमान्य संघटना असुन या संघनेच्या माध्यमातून शिक्षकांना हक्काबरोबरच कर्तव्याची ही जाणीव करुन दिली जाते तसेत गुणवत्ता वाढीसाठी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शाळेच्या गरजा पुर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न केले जातात. संभाजीराव थोरात यांना विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळाल्यास हे कार्य अधिक गतिमान होणार असल्याने नजीकच्या काळात राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर घेण्यात येणाऱ्या  १२ प्रतिनिधीत त्यांना संधी मिळावी अशी आग्रही मागणी निवेदनात केली आहे .
या निवेदनावर प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्यासह कार्याध्यक्ष अंबादास वाजे,सरचिटणीस आप्पासाहेब कुल ,कोषाध्यक्ष जनार्धन निऊंगरे,राष्ट्रीय कार्याध्यक्ष मोहन भोसले ,महासचिव बाळासाहेब झावरे, एन.वाय.पाटील,विनोद राऊत ,महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा तकटे,सोमनाथ टकले,भक्तराज दिवाने,अशोक जाधव,श्रीमती सुरेखा स्वामी,श्रीमती प्रिया सहस्त्रबुद्धे ,श्रीमती अनुराधा देवळे यांच्या सह्या आहेत.
                                     ------------------                       --------------------
 विधानपरिषदेत माध्यमिक शिक्षक ,प्राध्यापक ,पदवीधर ,डाँक्टर ,वकील ,इंजिनियर तसेच वेगवेगळ्या वर्गाचे प्रतिनिधी आहेत पण प्राथमिक शिक्षक व प्राथमिक शाळेचा प्रतिनिधी नाही.राज्यात प्राथमिक शिक्षक मोठ्यासंख्येने असुन ही प्रतिधीनी नाही कींवा शिक्षक मतदार संघात पण प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मतदान करण्याचा अधिकार नाही   म्हणून राज्यातील प्राथमिक शाळा व प्राथमिक शिक्षकांचा प्रतिनिधी  राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेत घेणे गरजेचे आहे.
 - बाळकृष्ण तांबारे प्रदेशाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ

 
Top