लोहारा/ प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे शेतकऱ्यांची शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना प्रकल्प वरील बियाणे लकी ड्रा प्रमाणे देण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी  पाऊस पडल्या शिवाय पेरणी करु नये.मुबलक पाऊस नसल्यामुळे बियाणे उगवणक्षमता कमी दिसुन येत आहे.
  बीज प्रक्रिया
बुरशीजन्य रोगापासून संवरक्षण साठी 50 ग्राम ट्रायकोडर्मा किंवा कार्बोक्सिन+थायरम 30  ग्राम आणि तदनंतर नत्र स्थिरीकरण साठी रायझोबियम  250 ग्राम + पीएसबी 250 ग्राम  प्रति 10 किलो बियाणेस हळुवारपने चोळावे.
 रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी 
या पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे हे पेरणीसाठी 20% कमी प्रमाणात लागते आणि बियाण्याची बचत होते. चार सोयाबीन च्या ओळीनंतर एक सरी सोडल्यास पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाऊस कमी झाल्यास सरीमध्ये पाणी बराच काळ साठुन राहते आणि जरी पाऊस जास्त पडला तरी अतिरीक्त पाणी हे सरीद्वारे बाहेर काढता येते. आंतरमशागत आणि फवारणी ही चांगल्या प्रकारे करता येते. हवा खेळती राहून पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादनात 20% पर्यंत वाढ होते.
 निंबोळी अर्क तयार करणे 
सध्या सर्वच शेतकऱ्यांनी निंबोळी अर्काचा वापर केल्यास फवारणीचा खर्च ही कमी होतो आणि रसशोषक किडी आणि आळ्याचे पण नियंत्रण होते, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून बीजप्रक्रिया चे प्रात्यक्षिक करून दाखवले व मनरेगा अंतर्गत गांडुळ खत युनिट, फळबाग लागवडीची माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी लहु गायकवाड, रवि शिदोरे, मुकेश मुळे, जिनेंद्र कासार, नितीन आष्टेकर , अहमद पटेल, प्रविण चिंचनसुरे, कृषि मित्र पिंटु मदने, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top