गोविंद पाटील / प्रतिनिधी-
कोरोना काळात गावात एक ही रूग्ण आढळून आला नाही, याचे सर्व श्रेय हे माझे नसून  ग्रामस्थ व आशा कार्यकर्ती  व येेेथे काम करणाऱ्या पोलिस स्टाफ यांचे आहे, असे प्रतिपादन बेंबळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक एम.आय.शेख यांनी केले.
तालुक्यातील धुत्ता गावामध्ये ग्राम दला मार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस निरीक्षक मुस्तफा शेख बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, गावात विकासात्मक कामे करताना सकारात्मक विचार जोपासने गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या गावातील सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष यांच्यासोबत समन्वय राखून गावाची प्रगती करणे गरजेचे आहे. कोरोना काळात धुत्ता ग्रामस्थांनी व आशा कार्यकर्ती, गावातील युवकांनी खूप सहकार्य केल्यामुळे श्री. शेख यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार ही मानले. तसेच सर्व ग्रामस्थांनी ही कोरोना योध्दांचे  मनपूर्वक आभार मानले.
श्री. कपाळे यांचे काम प्रशंसनीय
बेंबळी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलिस नाईक सचिन कपाळे साहेब ज्यांनी मानवतेचे दर्शन घडवत अधिकारी म्हणून ड्युटी करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासून ग्रामस्थांच्या पुढे एक आदर्श निर्माण केला. त्यांनी कोरोना काळात जनजागृती करण्यासोबतच रस्त्यावर पडलेले खड्डे  बुजवून  गावाला चांगली अशी दिशा दिली आहे. असे पोलिस निरिक्षक  शेख यांनी कार्यक्रमादरम्यान सांगून श्री. कपाळे यांच्या कामाचे कौतुक केले.
या कोरोना योध्दांचा झाला सन्मान 
  बेंबळी पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री. एम .आय.शेख , पोलिस नाईक सचिन कपाळे, सुधाकर भांगे साहेब , मामिलवाड साहेब, जगताप साहेब, सहकारी  होमगार्ड कोळगे, वाघुलकर, माने , कसपटे यांच्यासोबत ग्रामसेवक व्ही. एस. शिंदे मँडम , तंटामुक्त अध्यक्ष यूवराज विष्णु पिंपरे, ग्रामपंचायत संगणक परिचालक कलिम महेबूब शेख,  महात्मा गांधी बहूऊद्देशिय संस्था उस्मानाबादचे अध्यक्ष डाँ. काझी साहेब व सर्व कोरोना सहाय्यता कक्षाच्या अधिकारी कर्मचारी व वाँरियर्स यांचा ही महात्मा गांधी बहूऊद्देशिय संस्था उस्मानाबाद तर्फे कोरोना योध्दा प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.

 
Top