उस्मानाबाद  / प्रतिनिधी-
 उस्मानाबाद जिल्हयातील परंडा येथील एका 54 वर्षीय पोलीस कर्मचान्याचा कोरोनामुळे सोलापूर येथे उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला , कोरोनाचा हा उस्मानाबाद जिल्हयातील 8 वा बळी ठरला आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे.कोरोना योध्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने पोलीस विभागात शोककळा पसरली आहे.
दि. 13 जून रोजी परंडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र त्यांना लिव्हर व किडनीचा आजार असल्याने उपचारासाठी सोलापूर येथील यशोधरा रुग्णालयात पाठविण्यात आले होते मात्र मध्यरात्री 2.40 वाजता त्याची प्राणज्योत मावळली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचे 183 रुग्ण असून त्यापैकी 136 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत तर 40 जणांवर उपचार सुरू आहेत आजवर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल उस्मानाबाद येथील एका 55 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला होता. तुळजापूर तालुक्यातील माळूबा येथील महिलेचा उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला , ही महिला मुंबई येथून आली होती तिला रक्तदाब व शुगर त्रास होता.

 
Top