परंडा  / प्रतिनिधी-
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिना निमित्त दिनांक 10 बुधवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या स्थापनेला 21 वर्षे पूर्ण झाल्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यासाठी सूचना दिल्यामुळे परंडा येथील नगरपरिषद येथे रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये भूम परंडा वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी सकाळी 9 वाजता स्वतः प्रथम रक्त दान करून सुरुवात केली.त्यानंतर त्यांच्या पत्नी यशस्वीनी सामाजिक अभियानाच्या राज्य समनवयक वैशाली ताई मोटे यांनी ही रक्त दान केले तसेच राहूल मोटे यांचे मोठे चिरंजीव विश्वजित राहुल मोटे यांनी ही पहिल्यांदाच रक्तदान केले 5.30 वाजे पर्यंत 208 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यामध्ये प्रामुखाने पै.नवनाथ अप्पा जगताप ,सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे तालुका अध्यक्ष संदीप पाटील , डॉ.सुरज मोटे, बाळासाहेब मोटे,राजकुमार माने,बच्चन गायकवाड ,आदी राष्ट्रवादी वर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
 यावेळी परंडा नगरपरिषद चे नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर , तालुका अध्यक्ष संदिप पाटील, शहर अध्यक्ष वाजीद दखनी , अॅड सुभाष वेताळ,धनंजय मोरे , भाऊसाहेब खरसडे ,दत्ता पाटील,धनंजय हांडे ,डॉ.रवींद्र जगताप ,राजकुमार पाटील सोनारीकर ,बापू मिस्किन, मलिक सय्यद ,नवजीवन चौधरी ,मनोज कोळगे ,संजय पावर ,धनंजय जाधव , नगरसेवक शेरू सौदागर,बब्बू जीनेरी ,दीपक भांडवलकर,सर्फराज कुरेशी ,संजय घाडगे, इरफान शेख, नंदू शिंदे ,श्रीहरी नाईकवाडी, जयंत शिंदे, जावेद मुजावर ,तंनू मुजावर,आदीसह तालुक्यातील व शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top