लोहारा/प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता बार्टीचे महासंचालक कैलास कणसे,समतादूत प्रकल्पाच्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, दिलावर सय्यद, जिल्हा प्रकल्प अधिकारी तुषार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यातील समतादूत गावोगाव निर्जंतुकीकरण करण्याचे सामाजिक कार्य करत आहेत. त्यामध्ये लोहारा तालुक्यातील वडगाव (गां) येथे स्वतः समतादूत नागनाथ फुलसुंदर यांनी संपूर्ण गावभर निर्जंतुकीकरण केले.
यावेळी उपस्थित तहसीलदार  विजय अवधाने, सरपंच बबन फुलसुंदर, तलाठी एस एस गलांडे, आणि गावकरी यांनी समतादूताचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी मा.तहसीलदार विजय अवधाने यांनी तुमच्या सारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या समतादूतांची या देशाला अत्यंत गरज आहे, तुमचे कार्य अतुलनीय आहे,असे उदगारले. सरपंच यांनी समतादूताने गावभर केलेल्या कामाची माहिती तहसीलदार व त्यांच्या टिमला दिली. यावेळी सहशिक्षक पांडुरंग फुलसुंदर,अक्षय भुसकांडे, मदार सय्यद, महेश राजमाने आदी उपस्थित होते.
 
Top