तुळजापूर /प्रतिनिधी-
येथील हाडको भागात  पंधरा ते सोळा कुञे विषारी औषध देवुन ठार मारल्याची घटना घडली.   घरफोडी व चोरी करण्याच्या उद्देशानेच या कुत्र्यांना िवश देऊन मारले असल्याचा आरोप रिपाई ने केला आहे. या  कुञ्यांची हत्या करणाऱ्या विरोधात  प्राणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपोई ने तुळजापूर पोलिस ठाण्याचे  पोलिस  निरक्षक यांना निवेदन देवुन केली.
चारचाकी गाडी फोडण्याची घटना ताजी असताना आता कुञ्यांना िवश देऊन मारल्याची घटना घडल्याने शहरात सर्वञ असुरक्षिततेचे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या गाडी फोडणे, कुञ्याची हत्या करणे या घटना राञीचा अंधारात घडत असल्याने गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. या घटने प्रकरणी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, हडको परिसरात चोरी, घरफोडी करण्याच्या उद्देशाने अज्ञात लोकांनी या भागातील पंधरा ते सोळा पाळीव कुञे विषारी औषध देवुन मारुन  अंबाई हाँस्पीटलच्या समोरील भागात टाकलेले आहे. यामुळे शहरत सर्वञ भितीचे वातावरण निर्माण झाले असुन  तरी याचा शोध घेवुन  त्यांच्यावर प्राणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाईचे तानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली या भागातील नागरिकांनी केली आहे

 
Top